पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा
By Admin | Updated: October 11, 2015 00:43 IST2015-10-11T00:43:57+5:302015-10-11T00:43:57+5:30
नंदुरबार : रहदारीचे नियम तोडण्याचा प्रयत्न करणा:या युवकास मारहाणप्रकरणी चार पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा
नंदुरबार : रहदारीचे नियम तोडण्याचा प्रयत्न करणा:या युवकास मारहाणप्रकरणी चार पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता युवकास चार पोलिसांनी अडवून काठीने बेदम मारहाण केली. ही बाब युवकाच्या नातेवाइकांना कळल्यावर नातेवाइकांचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. पोलिसांवर कारवाई करावी यासाठी जमाव ठाण मांडून होता. पोलीस निरीक्षक कटके, उपनिरीक्षक मुळे यांनी जमावाला समजविण्याचा प्रय} केला. परंतु जमावाने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुकलाल नारायण भिल, रा.चिंचपाडा भिलाटी याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.