अज्ञात हिंस्र प्राण्याकडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:59+5:302021-09-02T04:35:59+5:30
आठ बकऱ्यांचा फडशा अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील शेतकरी वैभव पुरुषोत्तम चौधरी यांचा अमळगाव शिवारातील शेतात झोपडीत बांधलेल्या आठ ...

अज्ञात हिंस्र प्राण्याकडून
आठ बकऱ्यांचा फडशा
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील शेतकरी वैभव पुरुषोत्तम चौधरी यांचा अमळगाव शिवारातील शेतात झोपडीत बांधलेल्या आठ शेळ्यांचा अज्ञात वन्य प्राण्याने फडशा पाडला. याबाबत वृत्त असे की, येथील तरुण शेतकरी वैभव चौधरी हे दुपारी चारच्या सुमारास आपल्या शेतात बांधलेल्या शेळ्यांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता त्यांनी सर्व आठही शेळ्यांचा फडशा पडलेला पहिला घटनेची माहिती तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना देताच त्यांचा मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी एन. आय. कट्यारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश पाटील यांनी शवविच्छेदन केले. विशेष म्हणजे हिंस्त्र प्राण्याने शेळ्यांच्या अंगावर फक्त जखमा करून मारले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या जनावराने हल्ला केला ते समजू शकले नाही. अमळगाव परिसर आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असताना तरुण शेतकऱ्याच्या पशुधनाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून इतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.