अमळनेरला अज्ञात व्यक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:45+5:302021-06-03T04:13:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा ...

Of an unknown person to Amalner | अमळनेरला अज्ञात व्यक्तीचा

अमळनेरला अज्ञात व्यक्तीचा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव - टाकरखेडे रस्त्यावर वन जमिनीत एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पळासदळे येथील गणेश आत्माराम पाटील यांनी पोलिसांना दिली. त्याच्या हातावर ओमचे चिन्ह, दिकशआवि असे गोंधलेले होते. त्याच्या छातीवर मारहाण झाल्याचे व पायाचे हाड मोडलेले दिसून आले.

जवळच रक्त लागलेले लाकूडदेखील पडलेले होते. तसेच रिकाम्या बाटलीला पेट्रोलचा वास येत होता. त्यामुळे त्या युवकाला आधी मारहाण करून नंतर जाळण्यात आले असावे, असा अंदाज आहे. नखे, केस, रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Of an unknown person to Amalner