दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ सज्ज

By Admin | Updated: May 20, 2014 01:27 IST2014-05-20T01:27:05+5:302014-05-20T01:27:05+5:30

उमवि : कलाम यांच्या हस्ते होणार विद्यार्थी भवनाचे भूमिपूजन

The University prepares for Convocation | दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ सज्ज

दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ सज्ज

 जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाचा २२ वा पदवीप्रदान समारंभ २१ मे रोजी दुपारी २.३० वाजता दीक्षांत सभागृहात होईल. यानिमित्ताने पदवी प्रदान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिली. दीक्षांत समारंभासाठी माजी राष्टÑपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला कुलसचिव ए. एम. महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य व्ही.आर. पाटील आदी उपस्थित होते. ३० हजार १४१ स्रातक समारंभात ३० हजार १४१ स्रातकांना मान्यवरांच्या हस्ते पदव्या देऊन गौरविण्यात येईल. यामध्ये कला व ललितकला विद्याशाखेचे ५ हजार २४७, मानसनीति व समाजविज्ञान विद्याशाखा ४ हजार ७१३, विज्ञान विद्याशाखा ५ हजार ४३७ स्नातक, विधी विद्याशाखा ४५३ स्नातक, वैद्यक व औषधनिर्माणशस्त्र विद्याशाखा ५३२ स्नातक, अभियांत्रिकी विद्याशाखा ४ हजार ४९८ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ६ हजार १९९ स्नातक आणि शिक्षणशस्त्र विद्याशाखा ३ हजार ६२ स्रातकांचा समावेश आहे. तसेच १३७ पीएचडी धारकांना सन्मानित करण्यात येणार आहे. तयारी पूर्ण दीक्षांत सभागृहात होणार्‍या या समारंभाची तयारी पूर्ण झाली आहे. २२०० निमंत्रितांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे. असा असेल दौरा दुपारी १.४५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. दुपारी २.१५ मिनीटांनी त्यांच्या हस्ते विद्यार्थी भवनाच्या कोनशीलेचे अनावरण होईल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता त्यांचे दीक्षांत समारंभात आगमन होईल. त्यानंतर ते विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. सायंकाळी ५.३० वाजता कलाम हे गांधी तीर्थला भेट देणार आहे. याठिकाणी ते शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्याशी हितगुज करणार आहेत. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. अनिल काक ोडकर, संचालक डी. आर. मेहता व संस्थापक भवरलाल जैन उपस्थित राहणार आहेत़

Web Title: The University prepares for Convocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.