जळगावात अधिसभा निवडणूकांसाठी विद्यापीठ विकास मंच, आघाडी एकत्र येणार?

By Admin | Updated: May 31, 2017 16:24 IST2017-05-31T16:24:56+5:302017-05-31T16:24:56+5:30

विद्यापीठाकडून पदवीधरांसाठीच्या 10 जागांचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे.

University Development Forum for Jalgaon Prefecture Elections, will be together? | जळगावात अधिसभा निवडणूकांसाठी विद्यापीठ विकास मंच, आघाडी एकत्र येणार?

जळगावात अधिसभा निवडणूकांसाठी विद्यापीठ विकास मंच, आघाडी एकत्र येणार?

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 31 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अधिसभा निवडणूक कार्यक्रम अद्याप सुरू झाला नसला तरी, पदवीधरांच्या मतदार नोंदणीस सुरुवात झाली आहे. विद्यापीठाकडून  पदवीधरांसाठीच्या 10 जागांचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्या आधीच विष्णू भंगाळे यांची विद्यापीठ आघाडी व दिलीप रामू पाटील यांचे विद्यापीठ विकास मंच एकत्र येवून निवडणूक लढविणार असल्याची माहिती आहे. तसेच यासाठी  दोन्ही गटांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सुधारित विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांची तरतूद आहे. या निवडणुकीसंदर्भात विद्यापीठाकडून  तयारी पूर्ण केली असून 1 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र तरी या निवडणूका बिनविरोध कशा पार पाडतील यासाठी विद्यापीठाकडून प्रय} सुरू आहेत. त्या प्रय}ानुसार दिलीप रामू पाटील यांच्या विद्यापीठ विकास मंच व विष्णु भंगाळे यांच्या विद्यापीठ विकास आघाडी यांच्या प्रमुख गट एकत्र  येण्यासाठी प्रय} सुरू आहेत. हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. तसेच सोमवारी विद्यापीठात झालेल्या बैठकीत दिलीप  पाटील यांनी देखील निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
 निवडणूक बिनविरोध झाल्यास विद्यापीठाचा बराच वेळ वाचणार आहे. यामुळे इतर प्राधिकरणाच्या निवडणूकादेखील विद्यापीठाला लवकर राबविता येणार आहे. तसेच राज्यात इतर विद्यापीठांसाठी उमवि पॅटर्न ठरु शकणार आहे. यासाठीच एकत्र येण्यासाठी प्रय} करू अशी माहिती विद्यापीठ विकास मंचचे सदस्य अॅड.अमित दुसाने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
यंदाच्या निवडणुकांमध्ये मनसेसह युवासेना व कॉँग्रेसची एनएसयुआयकडूनदेखील जोरदार तयारी असल्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत दिसून आले. तसेच पदवीधरांच्या सर्व जागा मनसेकडून लढविल्या जाणार असल्याचे अॅड.जमील देशपांडे यांनी सांगितले आहे. तर युवासेनेकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र विद्यापीठ विकास मंच व विकास आघाडी जरी एकत्र आल्या तरी बिनविरोध निवडणूकासाठी विद्यापीठाची मोठी कसरत लागणार आहे.

Web Title: University Development Forum for Jalgaon Prefecture Elections, will be together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.