विद्यापीठाकडून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:18+5:302021-04-09T04:16:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने नुकतीच शैक्षणिक वर्ष २०१९-२०ची पदवी व पदव्युत्तर ...

University announces final merit list | विद्यापीठाकडून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

विद्यापीठाकडून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने नुकतीच शैक्षणिक वर्ष २०१९-२०ची पदवी व पदव्युत्तर अभ्‍यासक्रमातील सर्व विषयांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्‍यात आली आहे. त्या त्या विषयांमध्‍ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांची ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्‍यात आली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा मागील वर्षी मार्च, एप्रिल महिन्यात आयोजित करण्‍यात आली होती. मात्र, कोरोना विषाणूने अक्षरश: हाहाकार माजविल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्‍यात आली होती. नंतर परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतीने घेण्‍यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर ऑक्टोबर-२०२० मध्‍ये पदवी व पदव्युत्तर अभ्‍यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्‍यात आल्या. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. नंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या. दरम्यान, नुकत्याच या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या सर्व विषयांची अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्‍यात आली आहे. प्रत्येक शाखेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे त्या यादीत प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.

यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

वैभवी शिंपी (बी.एस्सी.फिजिक्स), खुशबु व्यास (बी.एस्सी.इलेक्ट्रॉनिक्स), सिमरन वालेचा (बी.एस्सी.केमिस्ट्री), काजल मराठे (बी.एस्सी.मॅथमॅटिक्स), चिन्मय पाटील (बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स), ऐश्वर्या वाणी (बी.एस्सी. बॉटनी), उझमा नाझ शेख इकबाल (बी.एस्सी. झुलॉजी), प्रियंका धर्माधिकारी (बी.एस्सी. मायक्रोबायॉलॉजी), नम्रता फुलपगारे (बी.एस्सी. जिऑग्राफी), वैशाली सोनवणे (बी.एस्सी. कॉम्प्युटर), भूषण पाटील (बी.एस्सी. बॉयोकेमिस्ट्री), शेख मुन्नझा सदफ झाकीर (बी.एस्सी. इन्‍फॉर्मेशन), साक्षी महाजन (बी.एस्सी. बॉयोटेक्नॉलॉजी), सुमिता माली (बी.एस्सी. इन्व्हॉरमेंटल), नीरज पवार (बी.एस्सी. जिओइनफॉर्मेटिक), राहुल पाटील (बी.एस्सी. ॲक्चुरिअल), जागृती मराठे (एम.एस्सी. फिजिक्स), राजश्री चौधरी (एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स), देवश्री बाविस्कर (एम.एस्सी. फिजिक्स, विथ एनर्जी स्टडीज), पारस चौधरी (एम.एस्सी. फिजिक्स विथ मटेरिअल सायन्स), प्रियंका पोपटाणी (एम.एस्सी ऑर्गेनिक केमिस्ट्री), चांदणी सूर्यवंशी (एम.एस्सी इन ऑर्गेनिक केमिस्ट्री), हर्षाली बधान (एम.एस्सी फिजिकल केमिस्ट्री), मयूरसिंग गिरासे (एम.एस्सी केमिस्ट्री, विथ पॉलिमर), सौरभ मुळे (एम.एस्सी. केमिस्ट्री, विथ इंडस्ट्रीअल), निकिता चौधरी (एम.एस्सी. ॲनॅलिटिकल केमिस्ट्री), मोहिनी झांबरे (एम.एस्सी. केमिस्ट्री विथ पेस्टिसाइड, ॲग्रोकेमिक), उझमा खान (एम.एस्सी. मॅथमॅटिक्स), सुप्रिया पाटील (एम.एस्सी. स्टॅटिस्टिक्स), प्रियंका सैतवाल (कॉम्प्युटिशल मॅथ.), माधुरी बोरसे (एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स), गायत्री बारी (एम.एस्सी. बॉटनी), ज्योती सुंदराणी (एम.एस्सी. झुलॉजी), राजकमल पाटील (एम.एस्सी. मायक्रोबॉयोलॉजी), आयेशा सिद्दिकी खानूम साजिदुल्ल्ह खान (एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी), अनामिका पात्रा (एम.एस्सी. बायोकेमिस्ट्री), कल्पना माळी (एम.एस्सी. जिऑग्राफी), पुष्पावती अग्रहारी (एम.एस्सी इन्‍फॉर्मेशन टेक्नॉलाजी), कोमल देशमुख (एम.एस्सी. इन्व्हॉर्मेंटल), लक्ष्मीकांत नंदा (अपलाइड जिऑलॉजी), भारती डाबे (अल्पलाइड जिऑग्राफी), काजल चोपडे (एमसीए), स्वाती पाटील (इन्टग्रटेड), रूचिका चौधरी (बी.फार्मसी), मंगेश पाटील (एम.फार्मसी, फॅरामायूटिकल रसायनशास्त्र), स्वाती चव्हाण (एम.फार्मसी, औषधनिर्माणशास्त्र), शिवानी वाघ (औषधनिर्माणशास्त्र), नूपुर बाहेती (एम.फार्मसी, क्वाॅलेटी ॲश्युरन्स), शुभम राठी (एम.फार्मसी, फार्मेस्युटीस), हॅपी लुल्ला (क्लिनिकल फार्मसी), मानसी जाधव (बीई कॉम्प्युटर), दिव्या परदेशी (बीई इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन), सलोनी सैनी (बीई इन्स्ट्रुमेंटेशन), करण पाटील (बीई मॅकेनिकल), भूषण शिंदे (बीई इलेक्ट्रॉनिक्स), बुशरा शेख (बीई सिव्हिल), श्रेया झोपे (बी. आर्किटेक्चर), शादाब पठाण (बी.टेक केमिकल), गौरव बालदी (बीई केमिकल), अश्विनी चौधरी (बीई इलेक्ट्रिकल), पारास गुडखा (बी.टेक प्लॅस्टिक), निखिल जगताप (बीटेक पेंट‌्स), पवन पाटील (बीटेक. ऑल, फॅट ॲण्ड वॅक्स), शवी पवार (बीटेक फूड), आकाश पाटील (बीई ऑटोमोबाइल), सुचिता बिरारी (बीई इन्‍फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), उत्कर्ष विसपुते (बीई बायोटेक्नॉलॉजी), वृषाली शिरसाठ (बीटेक कॉस्मॅटिक), कोयल सरोदे (एम.टेक. केमिकल), योगेश पाटील (एम. टेक पेंट‌्स), निशा साळुंखे (फूड), अनुपमा काटे (एम.टेक. इन्व्हॉर्मेंटल), भारती सूर्यवंशी (बी.कॉम), विनिता लुंड (बीबीए), निकिता वालेचा (बीसीए), पायल पाटील (बीएमएस), कौशिकी चौधरी (ई कॉमर्स), जया नाहाटा (एम.कॉम), कल्पेश पाटील (एमबीए), यशश्री जखादी (एमएमएस कॉम्प्युटर), मोनिका मोटवाणी (एमएमएस पर्सनल मॅनेजमेंट), किरण पाटील (बी.ए. इंग्लिश), शीतल अहिरे (बी.ए. मराठी), वर्षा चौधरी (बी.ए. हिंदी), उन्नती राठोड (बी.ए. संस्कृत), उनझेला नाझा नफीस शेख (बी.ए. उर्दू), आकांक्षा साकलकर (एम.ए. इंग्लिश), ज्योत्स्ना कांबळे (एम.ए. मराठी), भावना प्रजापती (एम.ए. हिंदी), किरण सोनवणे (एम.ए. संस्कृत), सुमय्या बानो (एम.ए. उर्दू), अदनान अहमद शेख (बीएस हिस्ट्री), नितीशा सोनवणे (बी.ए. जिऑग्राफी), अतुल मोरे (बीए पॉलिटिकल सायन्स), सफिरा गावीत (बीए सॉसिऑलॉजी), रवींद्र शिंदे (बीए इकॉनॉमिक्स), पूनम कोल्हे (बीए मानसशास्त्र), विलास गव्हाळे (बीए फिलॉसॉफी), दीपाली पाटील (बीए डिफेन्स), मानसी मराठे (बीएसडब्ल्यू), शिल्पा चव्हाण (एमए हिस्ट्री), हर्षा महाजन (एमए सामाजिकशास्त्र), नीलिमा भोई (एमए अर्थशास्त्र), अनंत तेंडुलकर (एम.ए. मानसशास्त्र), अविनाश पाटील (एमए ‍फिलॉसॉफी), अनिता वाघ (एम.ए. डिफेन्स), ज्ञानेश्वर मोरे (एमएसडब्ल्यू), रोहित महाजन (एमएस पॉलिटिकल सायन्स), प्रियंका पाटील (एमए संगीत), ध्रुपल मेहता (एमफए आर्ट), महेंद्र पाटील (एमफफ पेंटिंग), डिगंबर शिरसाले (एमफए), उशिता जैन (एमफए प्रिंट मेकिंग), विलास भाद (एमफए व्हिझुअल कम्युनिकेशन), मच्छिंद्र भोई (एमफए आर्ट हिस्ट्री), रक्षा चोपडा (बीफए पेंटिग), अमोल भावणे (बीफए आर्ट), मयूरी हरीमकर (बीए संगीत), अविनाश इंगळे (बीए ड्रामाटिक्स), आकाश पाटील (बीए योगिक सायन्स), मृणल भोलाणे (बीव्हॉक फॅशन), मेघना जोशी (एमए मास कम्युनिकेशन), समाधान वाघ (एमए. डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉटस्), राजेश पाटील (एमए. योगिक सायन्स), मुकेश पावरा (एमए.व्ह्युमन्स स्टडीज), भावना सपकाळे (बी.व्हॉक ग्रीन हाउस टेक्नॉलॉजी), हर्षदा पाटील (बीव्हॉक. सॉइल ॲण्ड वॉटर), स्वप्निल महाजन (बीव्हॉक सॉफटवेअर डेव्हलमेंट) आदींनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Web Title: University announces final merit list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.