महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:20+5:302021-09-05T04:20:20+5:30
बोदवड : महागाईच्या वाढत्या भस्मासुराच्या विरोधात शनिवारी बोदवड तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीकडून बोदवड येथील पोस्ट कार्यालय गाठून त्या ठिकाणी ...

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचे अनोखे आंदोलन
बोदवड : महागाईच्या वाढत्या भस्मासुराच्या विरोधात शनिवारी बोदवड तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीकडून बोदवड येथील पोस्ट कार्यालय गाठून त्या ठिकाणी पंतप्रधान यांच्या नावाने शेणाची गवरी पोस्ट करण्यात आली आहे. याद्वारे गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र सरकारच्या काळात वाढणारी महागाई पाहता हे आंदोलन करण्यात आले. घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर खूपच वाढले आहेत. रोज वापर होणाऱ्या पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतीही हैराण करणाऱ्या आहेत. देशातील वाढणारी महागाई त्याच बेरोजगारीमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींवर आज पारंपरिक लाकूड फाटा व गवरीवर स्वयंपाक करण्याची वेळ गामीण भागात आली आहे. याचा निषेध म्हणून बोदवड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना रजिस्टर पार्सलने शेनाची गवरी पाठविली. यावेळी बोदवड महिला तालुका अध्यक्ष वंदना पाटील, शहर अध्यक्षा प्रतिमा खोसे, शहर उपाध्यक्ष कविता गायकवाड, अश्विनी पाटील, विमल चौधरी, वणिता चौधरी, बेबीबाई, कौसल्याबाई, गुलाबकोरबाई व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
बोदवड येथील पोस्ट कार्यालयाच्या समोर आंदोलनात सहभागी झालेल्या महिला.