जय गणेश फाउंडेशनच्या गणपतीचे अनोखे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST2021-09-22T04:19:05+5:302021-09-22T04:19:05+5:30
जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीची स्थापना कोरोना नियमांचे पालन करीत छोटेखानी स्वरूपात गणपती मंदिरात करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात ...

जय गणेश फाउंडेशनच्या गणपतीचे अनोखे विसर्जन
जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीची स्थापना कोरोना नियमांचे पालन करीत छोटेखानी स्वरूपात गणपती मंदिरात करण्यात आली होती. गणेशोत्सव काळात चित्रकला, वक्तृत्व, आदी विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीत भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, स्पोर्ट्स क्लब कार्याध्यक्ष चैत्राम पवार, कोषाध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ. अभय कोटेचा, अनुपसिंग ठाकूर, रवींद्र पाटील, अभिषेक वाणी, हर्षल वानखेडे, रवी जोनवाल, संतोष भंगाळे, शरद लोहार, विशाल आहुजा, सुधीर देशपांडे, महेंद्र महाजन, वामन कोलते, राजू कोलते, पुरुषोत्तम खंडेलवाल, आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंदिराच्या आवारातच एका सजवलेल्या कुंडात गणपती विसर्जन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.