चोपडा येथील रत्नावती नदीत अनोळखी युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 14:50 IST2019-04-20T14:48:50+5:302019-04-20T14:50:02+5:30

मोटरसायकलसह आढळला नदीत

Unidentified youth's body in Ratnavati river in Chopda | चोपडा येथील रत्नावती नदीत अनोळखी युवकाचा मृतदेह

चोपडा येथील रत्नावती नदीत अनोळखी युवकाचा मृतदेह

चोपडा : येथील रत्नावती नदीत ईदगाह मैदानाजवळ एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. सदर तरुणाच्या मृत्यूचे कारण समजले नसून ही घटना घात की अपघात ? यााबत शंका असून पोलिसांना तपासाचे आव्हान आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, १८ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या पूर्वी हतनूरच्या उजव्या कालव्यावरून दुचाकीसह रत्नावती नदीत पडलेल्या एका अनोळखी तरुणाचा (वय सुमारे २५) मृतदेह आढळला. सदर युवकाच्या अंगात निळ्या रंगाचा सदरा व निळ्या रंगाची जीन्सपॅण्ट आहे. तसेच त्याच्या उजव्या दंडावर 'अजय' असे नाव गोंदलेले आहे. हा युवक कोणाच्या ओळखीचा असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी केले आहे.
सदर युवक रत्नावती नदीत कालव्याच्या पुलावरून दुचाकीसह रात्रीच्या वेळी रस्ता न समजल्याने पडला की काही घातपात झाला ही बाब पोलीस तपासात निष्पन्न होईल. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.

Web Title: Unidentified youth's body in Ratnavati river in Chopda