जळगावात दोघांच्या झटापटीत अनोळखी तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: May 19, 2017 16:19 IST2017-05-19T16:19:24+5:302017-05-19T16:19:24+5:30
शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीक घडली.

जळगावात दोघांच्या झटापटीत अनोळखी तरुणाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - मद्यप्राशन करून येणा:या दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन झालेल्या झटापटीत एक तरुण जमिनीवर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीक घडली. मयत तरुणाची ओळख पटली नाही.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दोन जण जिल्हा रुग्णालयाकडे येत असताना त्यांच्यात वाद झाला. दोघेही हुमतरीतुमरीवर आले व दोघांमध्ये झटापट झाली. त्या वेळी एक तरुण जमिनीवर कोसळून बेशुध्द पडला. काही जणांनी ही माहिती पोलिसांना देऊन अत्यवस्थ झालेल्या तरुणास जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिका:यांनी त्यास मृत घोषीत केले. तरुणाच्या कपडय़ांच्या खिशामध्ये केवळ वीस रुपयांशिवाय काहीही आढळले नाही. त्यामुळे तरुणाची ओळख पटली नाही.