अज्ञात वाहनाच्या धडकेत शेवाळे येथील तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:39 IST2020-01-23T00:39:14+5:302020-01-23T00:39:45+5:30
शिंदाड, ता. पाचोरा : शेवाळे ते पिंप्री दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेवाळे येथील मोटारसायकल स्वराचा ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेवाळे येथील तरुण ठार
शिंदाड, ता. पाचोरा : शेवाळे ते पिंप्री दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शेवाळे येथील मोटारसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २१ रोजी रात्री झाली.
याबाबत माहिती अशी की, २१ रोजी पिंप्री सारवे येथे यात्रोत्सवानिमित्त लोकमनोरंजन म्हणून लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम पाहण्यासाठी शेवाळे येथून संजय देवचंद वाघ (वय २९) जात असताना शेवाळे ते पिंप्री दरम्यान रात्री १० वाजेच्या सुमारास त्यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल (एमएच १९ एके ३३९२) चालक संजय वाघ हे जागीच ठार झाले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती जवळच्या पोलिसांना दिली. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कौतिक देवचंद वाघ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप पाटील करीत आहेत.