अज्ञात वाहनाचा धडकेत पारोळ्यात मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST2021-08-12T04:20:29+5:302021-08-12T04:20:29+5:30

मुस्तकिम शेख खलील कुरेशी (२९, कुरेशी मोहल्ला, पारोळा) हा दुचाकी (एमएच/१८/वाय४७७७)ने पारोळ्याकडून एरंडोलकडे जात असताना एरंडोलकडून येणारा ट्रकवरील चालकाने ...

An unidentified vehicle hit and killed a laborer in Parola | अज्ञात वाहनाचा धडकेत पारोळ्यात मजुराचा मृत्यू

अज्ञात वाहनाचा धडकेत पारोळ्यात मजुराचा मृत्यू

मुस्तकिम शेख खलील कुरेशी (२९, कुरेशी मोहल्ला, पारोळा) हा दुचाकी (एमएच/१८/वाय४७७७)ने पारोळ्याकडून एरंडोलकडे जात असताना एरंडोलकडून येणारा ट्रकवरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन बेदरकारपणे चालवून तो त्याच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना त्याच्याकडून त्यांच्या ताब्यातील वाहनांचा वेग नियंत्रित न झाल्याने तो विरुध्द बाजूला येऊन मोटारसायकल स्वारास धडक दिल्याने मोटरसायकल स्वार मुस्तकिम शेख यांचा जागीच मृत्यू झाला.

या व्यक्तीस पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. योगेंद्र साळुंखे, प्रमोद सूर्यवंशी यांनी त्यास मृत घोषित केले. घटनास्थळावरुन ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन फरार झाला आहे. या ट्रकचा शोध घेणे सुरू आहे. याबाबत पारोळा पोलिसात युनूसखान् रशिदरवान कुरेशी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक ड्रायव्हरविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: An unidentified vehicle hit and killed a laborer in Parola