शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

जळगावात रेल्वे फलाटाखाली पाय टाकून बसल्याने अनोळखी वृद्ध जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 12:41 IST

रेल्वेच्या धक्क्याने दोन्ही पाय फॅक्चर

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात उपचार स्थानकावरील प्रवाशांनी ओरडून उठण्यासाठी आवाज दिले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - रेल्वे स्थानकावर फलाटाखाली पाय टाकून बसलेल्या वृद्धाचे पाय भरधाव रेल्वेच्या धक्क्याने रक्तबंबाळ होऊन फॅक्चर झाले. या अनोळखी वृद्धास रेल्वे पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात हलविले असून तेथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास फलाट क्रमांक दोन वर घडली.संध्याकाळी एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी वृद्ध जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन वर फलाटाखाली पाय टाकून बसला होता. त्यावेळी भुसावळकडून रेल्वे गाडी येत असताना त्याला स्थानकावरील प्रवाशांनी ओरडून उठण्यासाठी आवाजही दिले. तरीदेखील तो तेथून हलला नाही. त्यामुळे रेल्वेचा जोरदार फटका बसून दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले. या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पो.कॉ. मनोज मेश्राम यांनी या अनोखळी जखमीस जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन सुतार यांनी या वृद्धाचे दोन्ही पाय फॅक्चर असल्याचे सांगितले.दरम्यान, हा अनोळखी शिवाजीनगरातील रहिवासी असावा, असा अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तविला. असह्य वेदनांमुळे हा वृद्ध जिल्हा रुग्णालयात विव्हळत होता.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव