शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रेल्वेखाली आल्याने ट्रॅकमनचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:05 IST

दोनगावात शोककळा

ठळक मुद्देकर्तव्य बजावताना अपघातमाजी सरपंचाचा मुलगा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - रात्रपाळीत कर्तव्य बजावत असताना विजय कैलास पाटील (वय-३०, रा़ दोनगाव, ता़धरणगाव) या तरूणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला़ ही घटना मलकापूर तालुक्यातील खुमगाव बुरटी स्टेशनजवळ सोमवारी पहाटे पाच वाजता घडली़ सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर दोनगाव येथे अंत्यसंस्कार झाले़धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील तरुण विजय कैलास पाटील हे रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीला होते़ रविवारी रात्री खुमगाव बुरटी स्टेशनजवळ ड्युटीवर असताना विजय हा धावत्या रेल्वेखाली आला़ त्यात त्याचे दोन्ही पाय कापले गेले अन् चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यामुळे विजय याचा जागीच मृत्यू झाला़रेल्वे पोलिसांनी त्वरीत विजय याच्या नातेवाईकांना कळविले़ नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली़ तर मृतदेह हा विजयचा असल्याची ओळख पटली़ शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ सोमवारी सायंकाळी विजय यांच्यावर दोनगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़वर्षभरापूर्वीच झाले लग्नविजय पाटील हा दीड वर्षापूर्र्वी रेल्वेत नोकरीला लागला होता़ नोकरीला लागल्या पासूनच तो खुमगाव बुरटी येथे कार्यरत होता़ दरम्यान, सासºयाकडून अधिक मासाचे आंमत्रण आल्याने तो रविवारी रात्री ड्युटी करुन सोमवारी सकाळी गरताड येथे जाणार होता़ वर्षभरापूर्वीच ८ मे २०१७ रोजी विजयचा गरताड येथील सखाराम त्र्यंबक पाटील यांच्या मुलीशी विवाह झाला होता. त्यांना दीड महिन्याची मुलगी आहे़माजी सरपंचाचा मुलगामयत विजय हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता़ विजय हा दोनगाव येथील माजी सरपंच कैलास भागवत पाटील व विद्यमान ग्रा़पं़सदस्या छायाबाई कैलास पाटील यांचा मुलगा होता़ तो तिघा भावंडामध्ये मोठा असून त्याच्या पश्चात एक बहिण, एक भाऊ असून बहिणीचे लग्न झाल आहे़ बहिण मुंबईला असते़ विजयच्या मृत्यूने संपूर्ण गाव सुन्न झाले होते़

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव