सभापतींची बिनविरोध निवड
By Admin | Updated: July 4, 2017 01:15 IST2017-07-04T01:15:33+5:302017-07-04T01:15:33+5:30
जामनेर पालिका : विविध विषय समित्या, स्थायी समिती सभापतीपदी साधना महाजन

सभापतींची बिनविरोध निवड
जामनेर : येथील नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापतींची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
पालिका सभागृहात सभापती पदाच्या निवडीसाठी आयोजित विशेष सभेला पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव टिळेकर उपस्थित होते. दुपारी 12 वाजता निवडणूक प्रकिया पार पडली. या वेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, व उपनगराध्यक्षा सुनीता भोईटे उपस्थित होत्या.
एकूण सात विषय समित्यांवर सभापती निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या वेळी स्थायी समितीच्या सभापतीपदी विद्यमान नगराध्यक्षा साधना महाजन यांची निवड झाली. तर सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी जावेद रशीद मुल्लाजी, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सुनीता अशोक नेरकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतीपदी सुनीता भोईटे, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी नंदा माधव चव्हाण, नियोजन व विकास समिती सभापतीपदी मुकुंदा विठ्ठल सुरवाडे, दिवाबत्ती समिती सभापतीपदी अख्तरबी गफ्फार, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शोभाबाई धुमाळ यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. वरील सर्वाचे सभापतीपदासाठी एकमेव अर्ज होते. सर्व नूतन सभापतींचे पीठासीन अधिकारी तहसीलदार नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वेळी नगरसेवक उत्तम पवार, छगन झाल्टे, श्रीराम महाजन, कल्पना पाटील, हसिनाबी मनियारसह मान्यवर उपस्थित होते.