भुसावळात नागरिकांना युनानी काढा मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:54 IST2020-07-24T14:54:05+5:302020-07-24T14:54:18+5:30
कोरोना संसर्गापासून बचावासाठी मालेगाव पॅटर्न काढा तयार करून मोफत वाटण्यात आला.

भुसावळात नागरिकांना युनानी काढा मोफत वाटप
भुसावळ, जि.जळगाव : येथील खडका रोड भागातील एक्सेल हॉस्पिटलतर्फे रजा टॉवर व अमरदीप टॉकीज चौकात २३ रोजी शहर व परिसरातील शेकडो नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचावासाठी मालेगाव पॅटर्न काढा तयार करून मोफत वाटण्यात आला. सुमारे चारशेवर नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या युनानी काढ्याने खोकला, सर्दी व अन्य आजारावर नियंत्रण मिळवता येते, असे डॉ.एजाजखान यांनी सांगितले.
यावेळी युनूस मामा शेख, मुजाहीद शेख, नदीम अरब, अशरफ तडवी, निसार खान, अकबर गवली, नजर शेख, कलीम शेख उपस्थित होते.