मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून उमेश शिंदे रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:43+5:302021-09-18T04:18:43+5:30

नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप जळगाव : पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी, कर्मचारी ...

Umesh Shinde joins as Stamp Collector | मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून उमेश शिंदे रुजू

मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून उमेश शिंदे रुजू

नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून संप

जळगाव : पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक अराजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार, २१ सप्टेंबरपासून संप पुकारण्यात आला आहे. पदोन्नती व इतर विषयांसंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याविषयी मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाच्या मुख्य सचिवांना कळविण्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संपात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

रोपवाटिकाधारकांना बियाणे विक्री परवाना बंधनकारक

जळगाव : रोपवाटिकाधारकांना बियाणे व बियाण्यांपासून रोपे निर्मिती करून विक्री करावयाची किंवा करीत असल्यास बियाणे विक्री परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उत्पादन, विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील ज्या रोपवाटिकाधारकांकडे बियाणे विक्री परवाना नसल्यास त्यांनी तत्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून बियाणे विक्री परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

केशव ठाकरे यांना अभिवादन

जळगाव : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, नायब तहसीलदार अमित भोईटे आदी उपस्थित होते.

Web Title: Umesh Shinde joins as Stamp Collector