आशियाई स्पर्धेसाठी उमाकांत, विराजची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:11 IST2017-08-12T01:11:01+5:302017-08-12T01:11:09+5:30

UMAKANT,VIRAJ SELECTED FOR ASIAN DODGEBALL | आशियाई स्पर्धेसाठी उमाकांत, विराजची निवड

आशियाई स्पर्धेसाठी उमाकांत, विराजची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क 
जळगाव : मलेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात उमाकांत राजेश जाधव आणि विराज कावडिया यांची निवड करण्यात आली आहे. 
भारतीय डॉजबॉल संघाचे सराव शिबीर मुंबई येथे २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेतून आशियाई संघ निवडला जाईल. तो संघ न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतीक डॉजबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे.  विराज हा रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर उमाकांत जाधव हा मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
विराज कावडिया याने तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे झालेल्या तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. उमाकांत जाधव याने हरयाणातील शालेय राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांची भारतीय संघात निवड झाल्याचे पत्र भारतीय डॉजबॉल महासंघाचे सचिव पी.एस. बरार यांनी पाठवले आहे. 
या निवडीबद्दल आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. नारायण खडके, विष्णू भंगाळे यांनी कौतुक केले आहे. 

Web Title: UMAKANT,VIRAJ SELECTED FOR ASIAN DODGEBALL