उल्हास साबळे यांना अटक व सुटका

By Admin | Updated: September 2, 2014 16:52 IST2014-09-02T16:48:54+5:302014-09-02T16:52:31+5:30

मालमत्तेच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या पतीच्या अंगावर वाहन नेत दुखापत केल्याच्या गुन्ह्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास साबळे यांना पोलिसांनी सोमवारी अटक करीत जामिनावर मुक्त केले.

Ulhas Sabale arrested and released | उल्हास साबळे यांना अटक व सुटका

उल्हास साबळे यांना अटक व सुटका

जळगाव : मालमत्तेच्या वादातून फिर्यादी व त्यांच्या पतीच्या अंगावर वाहन नेत दुखापत केल्याच्या गुन्ह्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक उल्हास साबळे यांना पोलिसांनी सोमवारी अटक करीत जामिनावर मुक्त केले.
३0 एप्रिल २0१२ रोजी फिर्यादी सुनीता संजय ईप्पर या पतीसह सागर पार्क परिसरातून जात होत्या. या दरम्यान उल्हास साबळे (रा.रिंगरोड) यांनी मालमत्तेच्या वादातून आपले एमएच १९/बीबी ६१६६ या क्रमांकाचे वाहन भरधाव वेगाने चालवून फिर्यादीला धडक दिली तसेच फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत आपल्याविरुद्ध खटला मागे न घेतल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. 
तपासाधिकारी गिरधर निकम यांना उल्हास साबळे हे घरी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निकम यांच्यासह पोलीस कर्मचारी माणिक सपकाळे, भास्कर पाटील, रवी नरवाडे हे त्यांच्या रिंगरोड येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी साबळे यांना अपघाताच्या गुन्ह्यात अटक करायची असल्याचे सांगितले. साबळे यांच्या कुटुंबीयांनी या कारवाईला विरोध दर्शविला. 
पोलिसांनी साबळे यांना जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले. उल्हास साबळे यांच्या विरोधातील गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना पोलिसांनी जामिनावर मुक्त केले. उल्हास साबळे यांना ताब्यात घेत सोबत नेताना पोलीस.

 

Web Title: Ulhas Sabale arrested and released