शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

 शिवस्मारकाचे अनावरण करुन उध्दव ठाकरेंची वचनपूर्ती; राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुतळा

By सुनील पाटील | Updated: September 10, 2023 16:31 IST

पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे अनावरण करुन शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी वचनपूर्ती केली.

जळगाव : पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे अनावरण करुन शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी वचनपूर्ती केली. दुपारी १२.१५ वाजता ठाकरे यांचे पिंप्राळ्यात आगमन झाले. सर्वात आधी कोनशिलेचे अनावरण त्यांनी केले. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भगव्या कापडात झाकण्यात आलेला हा भव्य पुतळा ठाकरेंच्याहस्ते खुला करण्यात आला.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून पिंप्राळ्यात भव्य असे शिवस्मारक उभारण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याहस्ते या शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले होते. त्याचवेळी या स्मारकाच्या उद‌्घाटनाला आपण येऊ व तेव्हा जळगावकरांशी संवाद साधू असे वचन ठाकरे यांनी दिले होते. त्याची वचनपूर्ती रविवार दि.१० सप्टेबर रोजी ठाकरे यांनी केली. पिंप्राळ्यातील हा पुतळा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आहे. खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, वैशाली सूर्यवंशी आदी शिवस्मारकाच्या ठिकाणी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच लोकांना प्रवेश देण्यात आला होता. कुलभूषण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील यांनी उध्दव ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी त्यांचे वडिल विरभान पाटील, आई सुमन पाटील, मुलगा देवेश, जय, दिव्या व भाऊ, वहिणी असा परिवार होता. ठाकरे यांनी या कुटूंबाशी संवादही साधला. त्यानंतर पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमानंतर ठाकरे वासू कमल विहार या अपार्टमेंटमध्ये माजी नगरसेवक अमर जैन यांच्याकडे गेले. तेथे ३० मिनिटे थांबून सभास्थळी गेले.

पुष्पवृष्टी अन‌् नृत्यउध्दव ठाकरे यांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुतळा अनावरण झाल्यानंतर पिंप्राळेकरांनी नृत्य करुन आनंदोत्सव साजरा केला. गुलाबी ढोल पथकानेही लक्ष वेधून घेतले होते. पिंप्राळेकरांना अभिवादन करुन ठाकरेंचा ताफा तेथून निघाला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :JalgaonजळगावUddhav Thackerayउद्धव ठाकरे