शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर आता मुक्त झाले; कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक, उद्धव ठाकरेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 18:21 IST

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत.

मुक्ताईनगर (जळगाव) - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुक्ताईनगर येथे उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते एकनाथ खडसे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. मुक्ताईनगर आज मुक्त झाले आहे. कशापासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे, असे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता म्हटले आहे. दरम्यान, आपण मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का स्वीकारली याचाही उलगडा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ''उद्धव हे तू करणार नसशील तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतली. २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो.  त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला.''२ लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा सरकारचा पहिला मोठा निर्णय ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात होती. आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच निर्णय घेणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे  - मुक्ताईनगर आज मुक्त झाले कशा पासून कुणापासून हे तुम्हाला ठाऊक आहे- उद्धव हे तू करणार नसेल तर हे होणारच नाही असे शरद पवार म्हणाले होते. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली-  २५ वर्ष ज्यांच्या सोबत होतो त्यांनी कधी विश्वास दाखवला नाही. आणि ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला- आता २ लाखाच्यावर कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणा-यांसाठी लवकरच निर्णय घेणार- ऑपरेशन लोटस ने तुम्हाला लोटलं आता सरकार पडण्याची हिम्मत दाखवून पाहा-  शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातुन मुक्त करीत शेतात दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे वचन देतो-   प्रशासन मला कळत नाही अशी विरोधक टिका करतात. त्याचा फार फरक पडत नाही. जनतेची काम झाली आणि होत आहे हे महत्त्वाचे

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Khadaseएकनाथ खडसेMuktainagarमुक्ताईनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा