शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष 

By विलास बारी | Published: May 09, 2024 8:57 AM

jalgaon lok sabha: मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. अमळनेर मतदार संघात  अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर मध्ये भाजपचे आमदार आहेत.

- विलास बारीलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा उद्धवसेनेने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पाटील (पवार) यांना उमेदवारी देत लढत रंगतदार केली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासमोरील आव्हान यावेळी मोठे असणार आहे. भाजपने माजी खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापल्यानंतर, त्यांनी करण पाटील (पवार) यांच्यासह उद्धवसेनेत प्रवेश केला.   

 या मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. अमळनेर मतदार संघात  अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर मध्ये भाजपचे आमदार आहेत.  गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून बंडखोर उभे करण्यात आल्याने सर्वाधिक त्रास हा शिंदेसेनेच्या आमदारांना झाला होता. याबाबतची  खदखद महायुतीच्या मेळाव्यात या आमदारांनी जाहीरपणे बोलूनदेखील दाखविली आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या मदतीवर भाजपच्या  विजयाचे गणित असणार आहे.

उद्धवसेनेची मदार कार्यकर्त्यांवर तर भाजपची नेत्यांवरमहायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिंदेसेनेकडे बहुतांश आमदार आहेत. सध्या उद्धवसेनेकडे आमदार नसले तरी कार्यकर्त्यांचे संघटन चांगले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेची सर्व मदार ही कार्यकर्त्यांवर आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर मात्र बहुतांश नेते हे शरद पवार गटात थांबून आहेत. त्या तुलनेत महायुतीकडे नेते व कार्यकर्ते यांचे चांगले संघटन आहे. या मतदारसंघातील सर्वच तालुक्यात भाजप, शिंदे सेनेचे आमदार आहेत. भाजपचे कार्यकर्त्यांचे संघटनदेखील चांगले आहे. त्यामुळे या मतदार संघात जोरदार लढत होण्याचे संकेत आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

भाजपकडून अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना, ३७० कलम, देशाची अंतर्गत व बाह्यसुरक्षा, शेतकऱ्यांना मिळणारा ६ हजार रुपयांचा सन्मान निधी, सात बलून बंधारे निर्मितीचे आश्वासन, निम्न तापी प्रकल्प हे मुद्दे हाताळण्यात येत आहेत.उद्धवसेनेकडून जिल्ह्यासह देशातील रोजगाराच्या समस्या, शेतकऱ्यांच्या धान्याला मिळत नसलेला हमीभाव, निम्न तापी प्रकल्प, केळी पीकविम्याची रखडलेली नुकसानभरपाई या मुद्द्यांवर भर दिला जात आहे.

जळगाव शहर व ग्रामीण  ठरणार निर्णायक nजळगाव तालुक्यात सर्वाधिक मतदार आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या दृष्टीने जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघ महत्वाचा असणार आहे. nचाळीसगाव तालुक्यात उद्धवसेनेचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील व भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला आहे.

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         २०१४    एम.के.पाटील     भाजप         २,९७,८६७    २००४    एम.के.पाटील     भाजप    २,८९,५५९        २००७    ॲड.वसंत मोरे    राष्ट्रवादी        २,४१,७०७    २००९    ए.टी.पाटील    भाजप        ३,४३,६४७    २०१४    ए.टी.पाटील    भाजप        ६,४७,७७३       

टॅग्स :jalgaon-pcजळगावUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा