घंटागाडीत दगड-माती टाकल्याचा प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:19+5:302021-02-05T05:59:19+5:30

संबंधित वाॅटर ग्रेस कंपनीला शहरातील साफसफाईचा ठेका दिल्यानंतर अनेकदा हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबद्दल मनपा प्रशासनाने मक्तेदारावर ...

The type of stone-clay thrown in the bell cart revealed | घंटागाडीत दगड-माती टाकल्याचा प्रकार उघड

घंटागाडीत दगड-माती टाकल्याचा प्रकार उघड

संबंधित वाॅटर ग्रेस कंपनीला शहरातील साफसफाईचा ठेका दिल्यानंतर अनेकदा हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबद्दल मनपा प्रशासनाने मक्तेदारावर दंडात्मक कारवाईही केली. मात्र, या कारवाईला न जुमानत मक्तेदाराचे कर्मचारी घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी दगड-माती टाकण्याचे प्रकार करीत आहेत. शनिवारी असाच एक प्रकारे एका नागरिकाने व्हिडिओ शूटिंग करून उघडकीस आणला आहे. मोठ्या डंपरमध्ये सफाई कर्मचारी २० ते २५ किलो वजनाचे वाळलेल्या सिमेंटचे तुकटे, दगड व माती टाकत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्तीने या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी चालकांचे नाव सांगितले, तर चालकाने आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर व्हायरल केल्याने मनपा वर्तुळात

एकच चर्चा रंगली आहे.

Web Title: The type of stone-clay thrown in the bell cart revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.