नवस फेडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: July 3, 2017 11:59 IST2017-07-03T11:59:21+5:302017-07-03T11:59:21+5:30
ब:हाणपूर येथील करण गोपाल (वय 18) व रुपेश राजू शाह (वय 16 रा.गांधी कॉलनी, लालबाग, ब:हाणपूर) या युवकांचा सुकता नदीत बुडून मृत्यू झाला.

नवस फेडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू
ऑनलाईन लोकमत
ब:हाणपूर,दि.3- ब:हाणपूर येथील करण गोपाल (वय 18) व रुपेश राजू शाह (वय 16 रा.गांधी कॉलनी, लालबाग, ब:हाणपूर) या युवकांचा सुकता नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडली. हे तरुण नवस फेडण्यासाठी गेले होते.
कुटुंबासह नवस फेडण्यासाठी गेलेल्या तरूण व त्याचा मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कुटुंबातील आनंदी वातावरण शोकमय झाले. उपनगर लालबागमधील गांधी कॉलनी येथील कुटुंब सकाळी मुलाचा नवस फेडल्यानंतर गंभीरपूरा गावातील शिवबाबा मंदिर येथे गेले होते. दोन तरुण आंघोळीसाठी नदीवर गेले. त्यावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला.