ईदच्या दिवशी धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू
By Admin | Updated: October 7, 2014 14:55 IST2014-10-07T14:55:28+5:302014-10-07T14:55:28+5:30
पालजवळील गारबर्डी धरणावर अंघोळ करत असताना फरहान खान कमाल खान (वय १८) व शेख अहमद शेख शब्बीर (वय १७) दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आणि ईदच्या सणावर विरजण पडले.

ईदच्या दिवशी धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू
शेख अहमद
रावेर : पालजवळील गारबर्डी धरणावर अंघोळ करत असताना फरहान खान कमाल खान (वय १८) व शेख अहमद शेख शब्बीर (वय १७) दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आणि ईदच्या सणावर विरजण पडले.
शहरातील उटखेडा रोडवरील रहिवासी असलेले १0 तरुण सकाळी बकरी ईदची नमाज पठण करून परतले. यानंतर चारचाकी वाहन भाड्याने करून ते तालुक्यातील पालजवळ असलेल्या गारबर्डी (सुकी) धरणावर सहलीसाठी गेले. त्यातील फरहान खान कमाल खान व शेख अहमद शेख शब्बीर हे दोघे धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी गेलेले हे तरुण बुडायला लागले. त्याठिकाणी जवळपास १0 फूट खोल पाण्याची पातळी आहे. त्यांना वाचवण्यासाठी एका मुलाने प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील मासेमारी करणार्या काही मुलांनी त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सावदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत फरहानुद्दीन हा दवाखान्यात कंपाउंडर म्हणून रुग्णसेवा करत होता, तर शे. अहमद हा बांधकाम मजूर म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (वार्ताहर)