शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉलाच्या धडकेत उपवरासह चहार्डीचे दोघे जागीच ठार, चोपडा शिरपूर रस्त्यावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 12:18 IST

ट्रॉला चालक फरार

ठळक मुद्देमहाजन कुटुंबातील एकुलता एक ‘दीपक’ विझला दोन्ही तरुण प्रमुख शिरपूर येथे होते कामाला

आॅनलाइन लोकमतचोपडा, जि. जळगाव, दि. ७ - कामावरून दुचाकीने घरी परतत असताना ट्रालाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील सागर कैलास शर्मा (२४), दीपक कैलास महाजन (२१) हे तरुण जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रॉला चालक ट्रॉला जागेवर सोडून फरार झाला. सागरचे २९ जून रोजी जळगाव येथील मुलीशी विवाह होणार होता. दोन्ही तरुण प्रमुख शिरपूर येथे कामाला होते.सागर व दीपक हे दोघे तरुण शिरपूर येथील टेक्सटाईल मधून कामावरून सोमवारी सकाळी चहार्डी येथे दुचाकीने गावाकडे येत असताना चोपडा शिरपूर रस्त्यावर हातेड बुद्रुक येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाजवळ सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास चोपड्याकडून शिरपूर कडे जाणारा ट्रॉलाने धडक दिली. त्यात दीपक महाजनच्या डोक्याची कवटी पूर्णपणे फुटली तर सागर शर्माचा चेहऱ्याची हाडांचा चुराडा झाला. सागर हा चहार्डी आणि परिसरात पुजारीचे काम करणारे कैलास शर्मा यांचा मोठा मुलगा होता. त्याचा विवाह जळगाव येथील मुलीशी २९ जून रोजी जळगाव येथे होणार होता. सागर शर्माच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, काका असा परिवार आहे. विवाहपूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली आणि दीपक महाजन हा कैलास महाजन यांच्या एकुलता एक मुलगा होता. दीपक महाजनच्या पच्यात आई वडील, आजी, आजोबा, दोन बहिणी असा परिवार आहे.दोघांची एकाच वेळी निघणार अंत्ययात्रादरम्यान दोन्ही ठार झालेले तरुण एकाच गल्लीतील रहिवासी असल्याने ७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता त्यांची एकत्र अंत्ययात्रा निघणार आहे. या घटनेने चहार्डीसह चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे तर चहार्डीवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव