दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T23:57:06+5:302015-10-18T23:57:06+5:30
नंदुरबार : एकाच रात्री चार दुकाने फोडणा:या दोघा आरोपींना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने सुनावली.

दोघांना दोन वर्षे सक्तमजुरी
नंदुरबार : एकाच रात्री चार दुकाने फोडणा:या दोघा आरोपींना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने सुनावली. दोन्ही नागपूर येथील रहिवासी आहेत. नंदुरबारातील तळोदा रस्त्यावरील सिंधी कॉलनीतील पूजा मेडिकल स्टोअर्स, लकी फॅशन, न्यू मिलन बेकरी, स्टाईल झोन या दुकानांचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून रोख रक्कम व कपडे चोरून दुकानफोडी झाली होती. 24 सप्टेंबर 2013 रोजी घडलेल्या या घटनेत 48 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास फौजदार डी.पी. गुळींग, हवालदार विश्वास मेहेत्रे यांनी केला. तपासात पूजा मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमे:यात संशयित आरोपी हे गल्ल्यातून पैसे काढत असताना दिसून येत होते. त्यावरून सीडी तयार करण्यात आली. त्या सीडीमध्ये दिसत असलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध पथकाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी नरेश गुरव यांनी घेतला असता संशयितांपैकी सुलतान अहेमद शेख, जब्बार अहेमद शेख, रा.नागपूर हे शहरात संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले. त्यांना संशयावरून अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता आणि सीडीमधील संशयितांची चेहरेपट्टी पाहिली असता ते हेच दोघे असल्याचे निश्चित झाले. त्यांनी तशी कबुलीही दिली. गुन्ह्यात चोरलेल्या मालापैकी पाच हजार रुपये रोख काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सपकाळे यांनी युक्तिवाद केला. साक्षीदार आणि पुरावे लक्षात घेऊन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1 नवले यांनी दोन्ही आरोपींना दोन वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.