दोन वर्षांपासून फरार असलेल्या दुचाकी चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST2021-04-21T04:16:08+5:302021-04-21T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या विरसिंग शिवलाल बारेला (बोरगाव ता. ...

दोन वर्षांपासून फरार असलेल्या दुचाकी चोरट्याला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या विरसिंग शिवलाल बारेला (बोरगाव ता. पधाना जि. खंडवा मध्य प्रदेश) या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी तालुक्यातील कानळदा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
बारेला याने तालुक्यातील फुफनगरीतील श्यामकांत जाधव या शेतकऱ्याची दुचाकी चोरी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुचाकी चोरणारा संशयित हा कानळदा येथे त्याच्या नातेवाइकाकडे आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक भारत पाटील यांच्या पथकाचे त्याला अटक केली.गेल्या दोन वर्षांपासून बारेला हा नंबरप्लेट काढून चोरीची दुचाकी वापरत होता.