अडावदजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 16:39 IST2017-04-25T16:39:00+5:302017-04-25T16:39:00+5:30

ट्रकने दुचाकीस मागून दिलेल्या धडकेत एका शेतक:याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला.

Two wheelers killed in a truck near Adawad | अडावदजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अडावदजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

 चोपडा/अडावद,दि.25- ट्रकने दुचाकीस मागून दिलेल्या धडकेत एका शेतक:याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावरील अडावद-लोणी दरम्यान झाला.

खर्डी येथील शेतकरी नवाब गुलशेर तडवी (37) व हेमराज संतोष पाटील (36) हे आज मक्याचे पेमेंट घेण्यासाठी दुचाकीने (एमएच 19- सीपी 2739)  अडावदला जात होते. लोणी गावानजीक मागून येणा:या ट्रकने (एमएच18- एम 4410) दुचाकीस जोरदार धडक देवून जवळपास 50 ते 60 फूट फरफटत नेले. यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टाकीतून पेट्रोलची गळती सुरू झाली. घर्षणामुळे स्पार्किग होत टाकीचा स्फोट झाला. यात दुचाकी अर्धीपेक्षा जास्त जळाली. दुचाकीवरील नवाब तडवी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हेमराज पाटील हे जबर जखमी झाले. या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. नवाब तडवी यांच्या पश्चात प}ी, तीन मुली, दोन मुले आहेत.

Web Title: Two wheelers killed in a truck near Adawad