शिरसोदे गावातून दुचाकी लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST2021-08-21T04:22:06+5:302021-08-21T04:22:06+5:30
पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील रहिवासी असलेले एसटी महामंडळाचे चालक हे गावातील आपल्या मित्राच्या घरी ...

शिरसोदे गावातून दुचाकी लांबवली
पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील रहिवासी असलेले एसटी महामंडळाचे चालक हे गावातील आपल्या मित्राच्या घरी गेले असता अंगणात लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना दि. १९ रोजी घडली.
अमळनेरचे एसटी बसचालक रमाकांत यशवंत पाटील (रा. शिरसोदे) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली की, १९ रोजी रात्री दहाच्या सुमारास गावातील माझा मित्र अनिल सोनवणे यांच्या घरी खासगी कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी माझ्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एमएच-१८- अेके-८१९१) बाहेर अंगणात उभी केली होती. मित्राकडील काम आटोपून रात्री ११-३० वाजेच्या सुमारास मी घरी जाण्यासाठी बाहेर आला. मी लावलेली मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता, ती कुठेही दिसून आले नाही. ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार इक्बाल शेख करीत आहेत.