दुचाकीस धडक देणाऱ्या ट्रकचालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:26 IST2019-03-02T12:25:59+5:302019-03-02T12:26:05+5:30

राजस्थानात जाऊन केली अटक

Two-wheeler truck driver arrested | दुचाकीस धडक देणाऱ्या ट्रकचालकास अटक

दुचाकीस धडक देणाऱ्या ट्रकचालकास अटक

ठळक मुद्देजळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : दुचाकीला धडक देऊन ट्रकसह घटनास्थळावरून पोबारा करणाऱ्या ट्रकचालक रामदास गोरेलाल गुजर (रा़ उलावाडी, ता़ वाडी़ जि़ धौलपूर, राजस्थान) यास शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे़
१ फेबु्रवारी रोजी दुचारी २ वाजेच्या सुमारास खेडी गावाजवळील हॉटेल गौरव समोरून श्रीराम उत्तम पाटील (रा़ खेडी खडके ता़ एरंडोल) हे दुचाकीवरून जात असताना त्यांना आऱजे़ ११़ जी़बी़०२२७ क्रमांकाच्या मालट्रकने धडक दिली होती़ यात श्रीराम हे जखमी झाले होते़ त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देविदास सुरदास हे करीत असताना त्यांना ट्रकचा क्रमांक निषन्न झाला़ त्यावरून चालकाचे नाव समोर आले़
अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास सुरदास, भास्कर ठाकरे यांनी राजस्थान जाऊन ट्रकचालक रामदास गुजर यास अटक केली आहे़

Web Title: Two-wheeler truck driver arrested