किनगावसह परिसरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:25+5:302021-08-24T04:20:25+5:30
किनगाव, ता.यावल : किनगाव, नायगाव, वाघझीरा, मालोद, आडगाव, कासारखेडे, चिंचोली व डांभुर्णीसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ५ दुचाकींची चोरी ...

किनगावसह परिसरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ
किनगाव, ता.यावल : किनगाव, नायगाव, वाघझीरा, मालोद, आडगाव, कासारखेडे, चिंचोली व डांभुर्णीसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ५ दुचाकींची चोरी झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. चोरीस गेलेली एकही दुचाकी अद्याप सापडली नसून चोरटे अद्यापही यावल पोलिसांना सापडलेले नाहीत.
किनगावसह परिसरात गेल्या काही वर्षांपासून पोलिसांची रात्रीची गस्त बंद आहे. एवढेच नाही तर या परिसरात बिट हवालदार म्हणून कुणाची नेमणूक झाली आहे, हे देखील या परिसरातील नागरिकांना माहीत नाही. या परिसरात पोलीस क्वचितच नजरेस पडतात हे विशेष. याचाच फायदा चोरटे घेतात अशी चर्चा परिसरात आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी चक्क घरातील मंडळी घरात झोपली असतानाच चोरट्यांनी तीन घरांसह बसस्थानकावरील एका पानाच्या दुकानातून हजारो रूपयांची चोरी केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.