श्रीराम कॉलनीतून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST2021-05-06T04:16:41+5:302021-05-06T04:16:41+5:30

जळगाव : जुन्या असोदा रस्त्यावरील श्रीराम कॉलनीतील संभाजी भावलाल पाटील (वय ४९) यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच ...

Two-wheeler stolen from Shriram Colony | श्रीराम कॉलनीतून दुचाकी चोरी

श्रीराम कॉलनीतून दुचाकी चोरी

जळगाव : जुन्या असोदा रस्त्यावरील श्रीराम कॉलनीतील संभाजी भावलाल पाटील (वय ४९) यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एमएच १९ सीक्यू ३१५८) २४ जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत चोरी झालेली आहे. याप्रकरणी बुधवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गणेश गव्हाळे करीत आहेत.

नशिराबादला बांधकामावरून हाणामारी

जळगाव : सामाईक जागेवर बांधकाम करण्याच्या कारणावरून भास्कर अर्जुन चौधरी व विशाल भास्कर चौधरी यांनी सुरेश चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळई टाकून दुखापत केल्याची घटना नशिराबाद येथे ३ मे रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. या प्रकरणी खेमचंद सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गजानन देशमुख करीत आहे.

आशादीप वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ

जळगाव : गणेश कॉलनी येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील कर्मचारी आशा रामदास अनफट यांना रत्नमाला मुरलीधर सोनार या महिलेने अश्लील शिवीगाळ करून चाकूने मारून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार ३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. याप्रकरणी मंगळवारी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोज पवार करीत आहेत.

एक लाखासाठी विवाहितेचा छळ

जळगाव : माहेरून एक लाख रुपये व एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणावी यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जागृती प्रशांत रोटे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत गुणवंत रोटे, सासू मंगला रोटे, नंदोई कुरजित गणेश चौधरी, नणंद पल्लवी चौधरी (रा.जळगाव), नंदोई दिनेश काशिनाथ खडके व नणंद दीपाली खडके (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रेणुका नगरातील आग प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : रामेश्वर कॉलनी येथील रेणुकानगरात मंगळवारी लागलेल्या आग प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घरमालक भिकन निंबा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या वरच्या मजल्यावर लाकडी पार्टीशनच्या घरात रेखा भालेराव या भाड्याने वास्तव्याला होत्या. आगीत संसारोपयोगी साहित्य, भांडीकुंडी, धान्य व दहा हजार रुपये रोख जळून खाक झाले आहे. तपास हवालदार संजय धनगर करीत आहेत.

खेडी येथे प्रौढाची आत्महत्या

जळगाव : खेडी येथील शिवनगरात वास्तव्याला असलेल्या अनिल दौलत बोरसे (४७, मूळ रा. बांबरुड राणीचे, ता. पाचोरा) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तपास हवालदार रतिलाल पवार करीत आहेत.

Web Title: Two-wheeler stolen from Shriram Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.