बळीराम पेठेतून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST2021-08-15T04:19:56+5:302021-08-15T04:19:56+5:30

००००००००००० विवाहितेचा छळ जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील पूनम बारी या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ...

Two-wheeler lampas from Baliram Peth | बळीराम पेठेतून दुचाकी लंपास

बळीराम पेठेतून दुचाकी लंपास

०००००००००००

विवाहितेचा छळ

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील पूनम बारी या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती राहुल बारी, सासू मंगला बारी, जेठ महेंद्र बारी, नंदोई सुनील बुंधे, नणंद ज्योती बुंदे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

००००००००००००

कुसुंबा शिवारातून दुचाकीची चोरी

जळगाव : कुसुंबा येथील रामकृष्ण भास्कर पाटील यांची दुचाकी (क्र.एमएच.१९.बीटी.९४६२) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना ११ ऑगस्ट रोजी कुसुंबा शिवारातील सुरेशदादा नगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

००००००००००००

माहेरून पाच लाख आणावे, म्हणून छळ

जळगाव : माहेरून पाच लाख रुपये आणावे, म्हणून सेविया नीतेश साळवे या विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीतेश साळवे, सुरेश साळवे, मेरी साळवे, फिलीप साळवे, भरत साळवे (सर्व रा.सटाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

Web Title: Two-wheeler lampas from Baliram Peth