शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

जळगावनजीक कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील माय-लेकी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:38 PM

दुचाकी चालक जखमी

ठळक मुद्देसकाळीच काळाचा गालारुग्णालयात गर्दी

जळगाव - भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगावातील एकनाथ कॉलनीतील रहिवासी संगीताबाई सुकदेव पाटील (४३) व काजल सुकदेव पाटील (२२) या मायलेकी जागीच ठार झाल्या. हा अपघात ११ जून रोजी सकाळी साडेआठवाजेच्या सुमारास महामार्गावर एकलग्न गावानजीक घडला. यामध्ये सुकदेव ओंकार पाटील (५०) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह फरार झाल्याची माहिती मिळाली. या वेळी संतप्त झालेल्या गावकºयांनी काहीवेळ रस्ता रोखून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या लांब रांहगा लागल्या होत्या.सुकदेव पाटील हे पत्नी संगीताबाई व मुलगी काजल यांच्यासह १० रोजी पारोळा तालुक्यातील कामतवाडी येथे नातेवाईकांकडे गेले होते. तेथून ११ रोजी सकाळी जळगाव येथे येण्यासाठी निघाले असताना त्यांची दुचाकी एकलग्न गावाच्या पुढे आली त्यावेळी मागून येणाºया कंटेनरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये मायलेकी रस्तावर पडून त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सुकदेव पाटील बाजूला फेकले गेले व त्यांनाही जबर मार लागला.अपघातानंतर मायलेकींचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव