दुचाकीचोरीचे रॅकेट उघडकीस
By Admin | Updated: October 4, 2015 00:32 IST2015-10-04T00:32:56+5:302015-10-04T00:32:56+5:30
धुळे : दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यात देवपूर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे.

दुचाकीचोरीचे रॅकेट उघडकीस
धुळे : दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यात देवपूर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे. पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या 17 दुचाकी हस्तगत केल्या आहे. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. हस्तगत केलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे 3 लाख 25 हजार रुपये आहे. शहरातील साक्री रोडवर असणा:या कुमारनगरातील रहिवासी मनोहर जठूमल वासवाणी यांची (एमएच 18 -एक्स 5867) क्रमांकाची दुचाकी 7 ऑक्टोबर 2014 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास देवपुरातील जयहिंद महाविद्यालयाच्या समोरून चोरीस गेली होती. यासंदर्भात मनोहर वासवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांनी अलीमखान हुसेनखान पठाण (21, रा.विटाभट्टी, देवपूर, धुळे) याला अटक केली होती. चौकशी दरम्यान त्याने चोरलेली मनोहर वासवाणी यांची दुचाकी काढून दिली होती. पुढील चौकशीत त्याने शाहरूख खान शेख सलीम (21, रा.देवपूर, धुळे) व कमलेश शांताराम भोई (रा.धुळे) या दोन्ही साथीदारांची नावे सांगितली होती. या तिघांनी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या 19 पैकी 17 दुचाकी हस्तगत झाल्या. ही कामगिरी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, हे.कॉ. नारायण पाटील, रवींद्र पाटील, कैलास पाटील, जावेद पठाण, मनोज बागुल, चंद्रशेखर नागरे, संदीप अहिरे, नरेंद्र शिंदे यांनी केली. या दुचाकींचा समावेश एमएच 18- एक्स 5867, एमएच 15- बीडी 2189, एमएच 19- एक्स 3285, एमएच 05 -एएल 6623, एमएच 18- वाय 7114, एमएच 39- एच 613, एमएच 15- बीआर 1137, एमएच 15- के 3732, एमएच 18 -यू 6728, एमएच 41- यू 9870 यांच्यासह 7 विना क्रमांकाच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. कमी किमतीत विक्री चोरी केलेल्या दुचाकींची अत्यंत कमी किमतीत चोरटे विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.