शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:49 IST

प्रदेश प्रवक्त्यांचे संकेत: पत्रकार परिषदेत भाजपच्या धोरणांवर टीका

जळगाव : काँग्रेसची विकासकामे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे योगदान याबाबत शिवसेनेने वारंवार प्रशंसा केली आहे़ भाजप व सेनेत हा मुलभूत फरक असून पाठिंब्याबाबतचा प्रस्ताव सेनेकडून आल्यास विचार होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिले. मात्र, पाठिंब्याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचेही ते म्हणाले.शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ जनतेने आम्हाला सक्षम विरोधी म्हणून निवडून दिलेले आहेत ती भूमिका आम्ही पार पाडू, असेही ते म्हणाले़ नोटबंदीचा निर्णय अत्यंत दुर्देवी असून गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची पुण्यतिथी काँग्रेस करीत आहे़ अर्थव्यवस्थेची दयनीय स्थिती झालेली आहे. भूक बळींची संख्या वाढली़ बेरोजगारी ४५ टक्क्यांनी वाढली, बँक घोटाळ्यांमध्ये पाच वर्षात ७३ टक्क््यांनी वाढ झाली़ या घटनांमुळे सरकारच्या धोरणांविषयी शंका निर्माण झाली, कुठे चालला आहे देश माझा अशी परिस्थिती निर्माण झाली व त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या जागा घटल्या़ कुठलाही निर्णय नसताना काही घटना नसताना भारतीय अर्थव्यवस्थेची ५ ट्रीलीयनकडे वाटचाल हे विधान हास्यास्पद आहे़ सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप तिवारी यांनी केला़खान्देशला फायद्याचा ठरणार नदी जोड प्रकल्प ३१ जुलै २०१९ मध्ये भाजप सरकारने रद्द केल्याचे ते म्हणाले.अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबाबामुळे फडणवीस सरकारने हा करार रद्द केला व यामुळे जळगावचे मोठे नुकसान झाल्याचे तिवारी यांनी सांगितले़दरम्यान, जनता अजुनही भाजप सेनेकडून आशावादी होती म्हणून त्यांना संधी दिली आहे़ मात्र, आम्हाला सक्षम विरोधीपक्ष म्हणून कौल मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले़ नोटबंदीच्या मुद्दयावरून तिवारी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले़ खासगी कंपन्यांना रेड कार्पेट घालून द्यायचा या सरकारचा मूळ उद्देश असल्याचे ते म्हणाले़काँग्रेसच्या जिल्ह्यातील कमी जागांबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अत्यंत कमी जागा देण्यात आल्या होत्या़ नांदेड मध्ये कॉंग्रेस आठ तर राष्ट्रवादी केवळ एका जागेवर लढली़ त्यामुळे जागा वाटप हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे अ‍ॅड़ संदीप पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी श्याम तायडे, श्रीधर चौधरी आदी उपस्थित होते़पाठिंब्याबाबत दोन मतप्रवाहशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत़ भाजप घटनात्मक चौकटी मोडायला निघाला आहे़ त्यामानाने शिवसेना पक्ष आक्रमक असला तरी कुणाचा द्वेष करणारा नाही, त्यांनी वारंवार काँग्रेसच्या विकासकामांची प्रशंसा केली आहे़ त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेत पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये हो व नाही असे दोन मतप्रवाह आहेत, सोनिया गांधी यांच्याकडून कुठलाही निर्णय याबाबत झालेला नाही़ शिवाय शिवसेनेकडून तसा कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही, असे तिवारी यांनी यावेळी स्पष्ट केले़

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव