शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

महामार्गावर दोन ट्रकच्या धडकेत चालकासह दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:13 IST

इंजिनमध्ये अडकला मृतदेह

ठळक मुद्देकोळसा ट्रकमधील दोन्ही भाऊ जखमी

जळगाव/नशिराबाद : नागपूर येथून कोळसा घेऊन येणारा व जळगाव येथून सिमेंट घेऊन जाणारा असे दोन ट्रक एकमेकावर धडकल्याने दोन जण ठार तर तीन जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजता तरसोद फाट्याजवळ झाला. अपघातांमुळे तीन तासांपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.पोपट पांडुरंग पठारे (५०, रा.शाहू नगर) व चालक गयास गंभीर पिंजारी (६८ रा.कासमवाडी) अशी या मृतांची नावे आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कणसे ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (क्र.एम.एच ०४ए.एल ६७४९) जळगावातील मालधक्क्यावरुन सिमेंट घेऊन भुसावळ येथे जात होता. या ट्रकवर चालक म्हणून गयास गंभीर पिंजारी, हमाल पोपट पांडुरंग पठारे व अफसर असली अहमद अली हे होते. हा ट्रक तरसोद फाट्याजवळ असताना समोरुन कोळसा घेऊन येत असलेला ट्रक (क्र.एम.एच.४० ए.के.७५९५) समोरासमोर धडकले. कोळशाचा ट्रक करनालसिंग मुलतानी यांच्या मालकीचा आहे. दरम्यान, पठारे यांना पत्नी व मुलबाळ नाही. ते भावाकडेच रहायचे तर कधी मालधक्कयावरच आपली रात्र काढत असे. गयास पिंजारी यांच्या पश्चात पत्नी बानोबी व शकील, सलीम, आसीफ हे तीन मुले तर मुलगी शबनम असा परिवार आहे.या अपघातात सिमेंटच्या ट्रकच्या कॅबिनचा चुराडा झाला. चालक पिंजारी याचा मृतदेह कॅबीनमध्ये अडकला होता. जोरदार धडक बसल्याने मागील सिमेंटच्या गोण्या या थेट कॅबिन तोडून चालक व हमालांच्या अंगावर आल्या. यात तीनही जण गोण्यांमध्ये दाबले गेले. यात पोपट पठारे याचा जागीच मृत्यू झाला तर चालक पिंजारी यांचा उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. क्रेन मागवून कॅबिनमध्ये अडकलेला मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले.कोळसा ट्रकमधील दोन्ही भाऊ जखमीअपघातानंतर सिमेंटच्या ट्रकमधील चालक गयास पिंजारी व अफसर अली अहमद अली (वय ४५ रा. पिंप्राळा हुडको) तसेच कोळशाचा ट्रकमधील चालक राजेश दत्तू ठाकरे (वय ४३) व अतुल दत्तू ठाकरे (वय ३५ दोन्ही रा. पिंपळा, नागपूर हे दोन्ही बंधू किरकोळ जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अफसर अली गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातामुळे ठाकरे बंधू कमालीचे घाबरलेले होते.कामाच्या पैशांपोटी क्रेनचालकाने नेल्या ट्रकच्या बॅटऱ्या... पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी क्रेनचालकाला फोन केला. ट्रक बाजूला केल्यानंतर या कामाचे पोलिसांकडून पैसे न मिळाल्याने के्रनचालकाने कोळशाच्या उभ्या ट्रकमधील बॅटºया काढून नेल्या. उपचारानंतर ठाकरे बंधू परतल्यावर पोलिसांनी त्यांना प्रकार लक्षात आणून दिला. यानंतर ठाकरे पैसे देण्यास तयार झाल्यावर के्रनचालकाशी संपर्क साधून बॅटºया परत करण्यात आल्या. अपघाताची माहिती मिळताच कणसे ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक योगेश सुरेश महाजन हमालांसह घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेले सिमेंटच्या गोण्या हटविल्या. यात ५ लाखांचे नुकसान झाल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले. सिमेंट रस्त्यावर पडल्याने धूळ उडून त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.पोलिसांची दमछाकअपघाताची माहिती मिळताच पाळधी महामार्ग पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील यांच्यासह मसराज जाधव, सोपान पाटील, रफीक तडवी, गजानन पाटील, चंद्रकांत सोनार, पंकज देशमुख यांनी घटनास्थळ गाठले. दुसºया बाजूने नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल, उपनिरिक्षक गणेश हिवरकर, वाहतूक कर्मचारी रवींद्र इंधाटे, युनूस शेख, सतीश पाटील, किरण हिवराळे, असदम सय्यद यांनीही घटनास्थळ गाठले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या पोलिसांची दमछाक झाली. अपघातग्रस्त सिमेंटचा ट्रक हटविण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. रस्त्यातील सिमेंटच्या गोण्याही बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दोन्ही बाजूने २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :Accidentअपघात