दोन ट्रकचा अपघात, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 21:58 IST2020-02-21T21:58:48+5:302020-02-21T21:58:53+5:30
ोपडा- यावल मार्गावरील चिंचोली गावाजवळील घटना

दोन ट्रकचा अपघात, दोघे जखमी
यावल : तालुक्यातील चोपडा- यावल मार्गावरील चिंचोली गावाजवळ २१ रोजी सकाळी दोन वाहनामध्ये झालेल्या अपघातात दोन जण जख्मी झाले आहे.
वृत असे की,सकाळच्या सुमारास य्चिंचोली रस्त्यावर ट्रक आणि लहान ट्रक यांचा समोरासमोर अपघात होवुन दोघेही वाहनांचे चालक जखमी झाले. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना या अपघाताची सुचना मिळताच ते तात्काळ अपघातस्थळी धावुन गेले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या अपघातात योगेश गौतम गोमटे रा. आमोदा, ता.यावल आणि विनोद सुखदेव यादव रा. चंद्रपूर हे दोघे जखमी झाले. दरम्यान या अपघाताबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये मात्र उशिरापर्यंत नोंद नव्हती.