भुसावळ येथील दोघा शिख भावंडाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 22:31 IST2020-02-04T22:30:58+5:302020-02-04T22:31:29+5:30

जीपला अपघात : भंडाऱ्याजवळील दुर्घटना

Two Sikh siblings died on the spot at Bhusawal | भुसावळ येथील दोघा शिख भावंडाचा जागीच मृत्यू

भुसावळ येथील दोघा शिख भावंडाचा जागीच मृत्यू

भुसावळ : येथून बिलासपुर येथे जात असलेल्या शीख समाजाच्या दोघा भावंडांच्या जीपचा भंडारा जवळ अपघात होऊन दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ४ रोजी दुपारी चार वाजता घडली . दरम्यान, शहरातील शीख समाजातील व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताबाबत वृत्त असे की, येथील बालाजी लॉन जवळील रहिवासी गुरमीतसिंह बल व जगरूपसिंग बल हे दोघे भाऊ भाड्याच्या जीपने भंडारा येथे कामानिमित्त जात असताना त्यांची भंडारा पासून काही अंतरावर पंक्चर झाली. यावेळी गाडीचे चाक बदलत असताना मागून येणाºया एका वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , मुले असा परिवार आहे .
दरम्यान, या आठवड्यात ३० रोजी शहरातील जळगाव रोडवर देवदर्शन घेऊन घरी परतणाºया सतनाम कौर सरजीत छाबडा या महिलेचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता.
 

 

Web Title: Two Sikh siblings died on the spot at Bhusawal