भुसावळात दोन शिवभोजन केंद्रे भागवताहेत गरजूंची ‘भूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 19:58 IST2020-08-20T19:56:59+5:302020-08-20T19:58:23+5:30
भुसावळ शहरांमध्ये दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रावर मंजुरीपेक्षाही अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

भुसावळात दोन शिवभोजन केंद्रे भागवताहेत गरजूंची ‘भूक’
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात गोरगरिबांना आधार म्हणून राज्य शासनाने भोजन योजना मंजूर केली आहे. मजुरांची उपासमार रोखण्यासाठी शासनातर्फे राज्यभर शिवभोजन थाळी योजना केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. यात भुसावळ शहरांमध्ये दोन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रावर मंजुरीपेक्षाही अधिक थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.
शहरातील जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ शिवप्रतिष्ठानचे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर दुसरे केंद्र जामनेर रोडवरील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
नगरपालिका जुन्या कार्यालयाजवळ असलेले शिवभोजन थाळी केंद्र हे रेल्वे, बसस्थानकाजवळ आहे. यामुळे त्या परिसरातील गरजू भूक भागवत आहे. या केंद्राला रेल्वेस्थानकाजवळ असल्यामुळे या केंद्राच्या परिसरामध्ये परप्रांतीय, अपंग, भिकारी असे अनेक लोक भुकेल्या पोटी फिरत असतात. या लोकांसाठी हे केंद्र आधार बनले आहे. या केंद्राला १२५ थाळीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त वाटप करण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे संचालक नमा शर्मा यांनी दिली. त्याचप्रमाणे अन्नाचे वजन निश्चित करण्यात आले आहे. मात्र आपण त्यापेक्षा अधिक वजनदार अन्न देत असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिलीे.
महामार्गावरून येणाºया-जाणाºयांना आधार
भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील नहाटा विद्यालयासमोर एका हॉटेलमध्ये चालवले जात आहे. या परिसरात महाविद्यालय असल्यामुळे त्याचप्रमाणे चौपदरीकरण रस्ता असल्यामुळे येणाºया जाणाºया लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अवघ्या तासाभरातच केंद्राला दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक थाळ्यांची विक्री केली जाते.