शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

अमळनेर तालुक्यात दोघा शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:17 IST

वाघोदे शिवारातील दुर्घटना, लोंढवे गावात शोककळा

संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश बळीराम देसले ( वय १५) , हितेश सुनील पवार (वय १५) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि आही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत हा गलितगात्र झाला. थरथरत्या अंगाने आणि कापºया आवाजाने त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच कैलास खैनरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनीटात बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबियांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना मृतावस्थेत पाहुन तेथेच हंभरडा फोडला. या घटनेने गाव सुन्न झाला आहे.पोहताना दोर तुटला आणि घात झाला..भावेश, हितेश आणि जयवंत या तिघांपैकी भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहण्याचे शिकवत होता. तर जयवंत हा काठावरच होता. त्यालाही दोघांनी पोहण्यासाठी येण्याचा आग्रह केला होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो नाल्यात उतरलाच नाही. काही वेळाने हितेशचा तोल जाऊ लागला. त्यात त्याला बांधलेला दोरही तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर जयवंत काठावर बसून मदतीचा प्रयत्न करीत होता. परंतु दुर्दैवाने हितेशचा पाय अधिकच खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवताना पोहता येत असूनही भावेश पाण्यात बुडला आणि दोन्ही मित्राच करुना अंत झाला.दोन्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलेभावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहिण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून शवच्छदेन करण्यात आले. यावेळी लोंढवे येथील ग्रामस्थ, दोन्ही मुलांचे कुटुंबिय, नातलग आणि शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.