शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:07 IST

सातोड आणि जुनेपाणी येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.

कुंदन पाटील 

जळगाव: सातोड (मुक्ताईनगर) आणि जुनेपाणी (चाळीसगाव) येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. तर अन्य ग्रा.पं.तील ४ सदस्यांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही सरपंच अपात्र सातोड (मुक्ताईनगर) येथील सरपंचपद ओबीसी संवर्गासाठी राखीव होते. या पदावर असणाऱ्या नयना श्रीधर पाटील यांनी पडताळणी केलेले जातप्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. शेषराव काशिनाथ पाटील व योगेश दयाराम कोळी यांनी ही तक्रार दाखल केली होती. नयना यांनी जात दाखल्यासाठी मध्य प्रदेश प्रशासनाकडून प्राप्त केलेले दाखले सादर केले होते. जातपडताळणी विभागाचे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.

जुनेपाणी पो.शिंदी ता.चाळीसगाव येथील अवलीबाई धर्मा राठोड यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अपात्र ठरविले आहे.गोरख आप्पा राठोड या सदस्यालाही अपात्र ठरविले असून यासंदर्भात पंकज कैलास गरुड, ज्ञानेश्वर पिळोदे, नामदेव तिकोडे, दिलीप कोकणे, सरुबाई जाधव यांनी तक्रार केली होती.

कुंझरचे दोघे अपात्रकुंझर (चाळीसगाव) ग्रा.पं.तील मनीषा संजय गढरी यांनी किरण ताराचंद मराठे, संगीता योगेश गढरी, सुमन मगनदास बैरागी, पूजा भूषण चौधरी यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार सुमन बैरागी यांच्या मुलाने आणि पूजा चौधरी यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश पारित केले आहेत.

  

टॅग्स :Jalgaonजळगावgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच