यावल/डांभुर्णी, जि.जळगाव : किनगाव-डांभुर्णीमार्गे जळगावला जात असलेली रुग्णवाहिका व जळगावकडून येत डांभुर्णीकडे येत असलेल्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. ठार झालेल्यांची नावे समाधान भाऊलाल कोळी व अंकुश श्याम कोळी अशी आहेत. दोघेही चांदसर, ता.धरणगाव येथील रहिवाशी आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास डांभुर्णी पेट्रोल पंपाजवळ घडलीे.घटनेचे वृत्त कळताच येथील पोलीस ठाण्याचे फौजदार ढोमणे व सहकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. रूग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.तालुक्यातील सौखेडासीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (क्रमांक एमएच-१९-एम-९२०५) ही रुग्णास जळगाव येथे नेत होती. तेव्हा डांभुर्णी गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ जळगावकडून येत असलेली मोटार सायकल (क्रमांक एमएच-३९ -बी-२२९३) यांची व रूग्णवाहिकेची जोरदार धडक झाली. धडक एवढी मोठी होती की, मोटारसायकलवरील दोघेही जण जागीच ठार झाले. दोघांचे मृतदेह जळगाव येथे नेण्यात आले आहेत.घटनेचे वृत्त कळताच यावलचे फौजदार ढोमणे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. येथील पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक पसार आहे.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे अपघात, चांदसर येथील दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 18:48 IST
किनगाव-डांभुर्णीमार्गे जळगावला जात असलेली रुग्णवाहिका व जळगावकडून येत डांभुर्णीकडे येत असलेल्या मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे अपघात, चांदसर येथील दोन जण ठार
ठळक मुद्देरूग्णवाहिका चालक घटनास्थळावरून पसारमोटारसायकल आणि रुग्णवाहिका यांची समोरासमोर धडक