ट्रकला चारचाकी धडकल्याने दोन ठार, चार गंभीर
By Admin | Updated: March 27, 2017 13:25 IST2017-03-27T13:25:04+5:302017-03-27T13:25:04+5:30
जाडगाव फाटय़ावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ ठार झालेले कुटुंब जळगाव येथील असून ते अकोला येथील एका लग्नसमारंभावरून परत येत होते.

ट्रकला चारचाकी धडकल्याने दोन ठार, चार गंभीर
फुलगाव, ता.भुसावळ, दि.27- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर ट्रकला ओव्हरटेक करणा:या चारचाकी समोरून येणा:या ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल़े जाडगाव फाटय़ावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला़ ठार झालेले कुटुंब जळगाव येथील असून ते अकोला येथील एका लग्नसमारंभावरून परत येत होते.
या अपघातात चारचाकी चालक सुधीर शांताराम सोनवणे व गणेश अभिमन्यू फुलपगारे (दोघे रा़ जळगाव) जागीच ठार झाले तर प्रथमेश फुलपगारे, सीमा भगत, गिरीश तायडे, शामा देविदास भोलाणे हे गंभीर जखमी झाल़े त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल़े मयत व जखमी हे जळगावच्या स्काऊट-गाईड कार्यालयात नोकरीला असल्याची माहिती मिळाली आह़े आशिया महामार्गावरील जाडगाव फाटय़ावर चारचाकी (एम़एच़19 एएक्स 0585) ही ट्रकला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणा:या ट्रकवर आदळली़
सात महिन्याची चिमुकली बचावली
या अपघातात सात महिन्याची चिमुकली बचावली आह़े वरणगाव येथील पी.ए.पाटील यांच्याकडे या चिमुरडीला तात्पुरता ठेवण्यात आले आह़े