दोन वाहनांच्या धडकेत 10 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:06 IST2017-03-15T00:06:58+5:302017-03-15T00:06:58+5:30
पारोळा : अपघाताची नोंद नाही

दोन वाहनांच्या धडकेत 10 जण जखमी
पारोळा :काली-पिली व अन्य एक चारचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत 10 जण जखमी झाले. जखमीत दहावीतील तीन विद्याथ्र्याचा समावेश आहे. हा अपघात पारोळा-चोरवड रस्त्यावर कामतवाडी फाटय़ाजवळ आज दुपारी दीड वाजता झाला.
पारोळ्याहून चोरवडकडे जाणारी चारचाकी (क्र. एमएच 19-अेएक्स 4095) व चोरवडकडून पारोळ्याकडे येणारी काली-पिली (क्र.एमएच 19-जे 1694) यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात काली-पिलीचे दोन्ही चाकांसह एक्सल निखळून पडले. तर दुस:या चारचाकीचा चेंदामेंदा झाला. जखमींना नगराध्यक्ष करण पाटील, कृउबा संचालक अविनाश पाटील, नगरसेवक भैया चौधरी, पी.जी.पाटील, सागर बधान, कैलास पाटील यांनी तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत रनाळे, डॉ. राजेश वाल्डे, डॉ. सुनील पारोचे यांनी प्रथमोपचार केले.
याप्रकरणी रात्री उशिरार्पयत पारोळा पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आलेली नव्हती. (वार्ताहर)
अपघातात दहावीच्या विद्यार्थिनी मोनाली राजेंद्र पाटील (16), हर्षा गोपाल वाघ (16), सपना गणेश पाटील (16, सर्व रा.चोरवड) या विद्यार्थिनींसह सागर जयकिसन पवार (22, रा.पिंपळगाव हरे), भारमल बाबू जाधव (36,मुकटी तांडा), हरीष आत्माराम राठोड (19), लीलाबाई सुरेश पाटील (45, रा. भडगाव), हिरकबाई सोमा पाटील (60, भडगाव), सुभाष निंबा वाडिले (41), शीतल शांताराम पाटील (20, रा. चोरवड) यांचा समावेश आहे.