मोरांच्या शिकारप्रकरणी दोन जणांना कोठडी

By Admin | Updated: October 16, 2015 00:39 IST2015-10-16T00:39:36+5:302015-10-16T00:39:36+5:30

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील मोरकारंजा परिसरात दोन मोरांची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना 26 ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Two people have been arrested for hunting for peacock hunting | मोरांच्या शिकारप्रकरणी दोन जणांना कोठडी

मोरांच्या शिकारप्रकरणी दोन जणांना कोठडी

विसरवाडी : नवापूर तालुक्यातील मोरकारंजा परिसरात दोन मोरांची शिकार केल्याप्रकरणी दोन जणांना 26 ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोरकारंजा व पानबारा गावाच्या शेजारील जंगलात 17 सप्टेंबर रोजी भगवान नारायण गावीत व दिनेश पुना गावीत दोघेही राहणार पानबारा, ता.नवापूर तसेच त्यांची आणखी एक साथीदार असे तिघांनी दोन मोरांची बंदुकीच्या साहाय्याने शिकार केली व मोटारसायकल (क्रमांक एमएच 41- के 8821)ने पळून जात होते. संशयिताना आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर ते पानबारा गावाजवळ मोटारसायकल सोडून पळून गेले. मोरकारंजा वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गावीत यांनी निवेदन दिले. वनविभागाने 13 ऑक्टोबर रोजी भगवान गावीत व दिनेश गावीत यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 26 ऑक्टोबर्पयत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Two people have been arrested for hunting for peacock hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.