नाडगावला दोन गटातील वादातून रेल्वे स्टेशन परिसरात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 21:45 IST2020-01-16T21:45:04+5:302020-01-16T21:45:09+5:30
तणावाचे वातावरण : घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

नाडगावला दोन गटातील वादातून रेल्वे स्टेशन परिसरात तोडफोड
बोदवड : शहराचे रेल्वे स्थानक असलेल्या नाडगाव येथे प्रतिभाताई पाटील नगरमध्ये दुपारी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता, त्यात एका गटातील तरुणाला मारहाण वा धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. हा वाद रात्री साडेसातच्या दरम्यान उफाळून जमाव स्टेशन परिसरात जमला व काही टपऱ्या उलटऊन तोडफोड करण्यात आली.
यानंतर हा जमाव प्रतिभाताई पाटील नगरकडे गेला होता. सदर घटनेची माहिती बोदवड पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगवत घटनेवर नियंत्रण मिळवले असून, नाडगाव मध्ये शुकशुकाट पसरला होता.
झोपडीचे केले नुकसान
प्रतिभाताई नगरात या जमावाने एका झोपडीचेही काही प्रमाणात नुकसान केले असून एक -दोन घरांचे गेटचे नुकसान केले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी सुरेश जाधव, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उप निरीक्षक भाईदास मालचे, यांनी सावदा, वरणगाव, येथून पोलीस बंदोबस्त मागववून घेतला आहे. परिस्तिथी नियंत्रणात असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटांचा शोध सुरु असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणलाही अटक करण्यात आली नाही.