शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 22:12 IST

देवळी आणि जामडी येथील घटना, वृद्ध व तरुणाचा समावेश

संजय सोनार / चाळीसगाव (जि. जळगाव) :चाळीसगाव परिसरात गुरुवारी एकाच दिवशी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुका हादरला आहे. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने जोरदार आघात करून निर्घृण हत्या करण्यात आली.  त्यापाठोपाठ जामडी येथे गुरुवारी दुपारी तरुणाचा खून झाला.  राजेंद्र सुकदेव पाटील (५५, रा. देवळी ता. चाळीसगाव) आणि तरबेज शहा याकूब शहा (२५,रा.जामडी ता. चाळीसगाव) अशी या खून झालेल्या इसमांची नावे आहेत. 

बुधवारी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे झोपण्यासाठी शेतात गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी त्यांचा गळा दोरीने आवळून मारण्याचा प्रयत्न केला.  तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार मारले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी दोरी व रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळून आला. याबाबत माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.  अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत. राजेंद्र यांचा मुलगा मुकेश पाटील (२३ रा.देवळी) याने याबाबत फिर्याद दिली. 

तरुण फकिराचा खून तालुक्यातील जामडी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुण फकीर तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. हा तरुण एका ठिकाणी बसलेला असताना पाठीमागून एकाने धावत येऊन त्याच्यावर सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. जामडी येथे गुरुवारी यात्रा होती. त्यामुळे भाविकांची गर्दी होती. त्याचवेळी ही घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. खुनाच्या या दोन घटनांनी तालुका हादरला आहे.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावCrime Newsगुन्हेगारी