आमदार भोळे यांचे लाखाचे दोन मोबाईल लांबविले

By Admin | Updated: July 5, 2017 04:16 IST2017-07-05T04:16:22+5:302017-07-05T04:16:22+5:30

आमदार सुरेश दामू भोळे यांचे मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये चार्जिंगला लावलेले एक लाख २० हजार रुपये किमतीचे दोन

Two lakh lacs of MLA Bhole have been delayed | आमदार भोळे यांचे लाखाचे दोन मोबाईल लांबविले

आमदार भोळे यांचे लाखाचे दोन मोबाईल लांबविले

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आमदार सुरेश दामू भोळे यांचे मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये चार्जिंगला लावलेले एक लाख २० हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल मंगळवारी चोरट्यांनी लांबविले.
भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे दीड लाखाचे मोबाईल चोरीची घटना ताजी असताना हा चोरीचा प्रकार घडला. आमदार भोळे हे सोमवारी रात्री मुंबई येथून जळगावला येण्यासाठी निघाले. ए-१ या वातानुकुलित बोगीत सीट क्रमांक २५-२६ हे त्यांचे आरक्षित होते.

Web Title: Two lakh lacs of MLA Bhole have been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.